अर्थव्यवस्था या विषयावरील प्रश्नः

 


*प्रश्न.१. तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही.?*

1) आर्थिक विकासासाठी वित्तव्यवस्था करणे.   
2) नियोजनासाठी भांडवल पुरविणे.
3) अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे.     ✔️
4) विकासयोजनेसाठी वित्त पुरवठा करणे.

*प्रश्न.२. एकूण खर्च – (प्राप्ती + घ्यावयाची रक्कम + सार्वजनिक मालमत्तेची विक्री) =?*

1) राजकोषीय तूट    ✔️
2) अंदाजपत्रकातील तूट
3) प्राप्ती तूट     
4) प्राथमिक तूट


*प्रश्न.३. गेल्या काही वर्षापासून ‘अंदाजपत्रकीय तूट’ नसते कारण..?*

1) भांडवली महसूल हा महसूली तुटीएवढा नेमका असतो.  ✔️
2) महसूल खात्यात आधिक्य असते.
3) सरकार राजकोषीय शिस्त पाळते.
4) वरीलपैकी कुठलेही नाही.


*प्रश्न.४. भारत सरकारच्या केंद्रीय अंदाजपत्रकातील तत्वानुसार राजकोषीय तूट काय दर्शविते.?*

1) सरकारची सर्व स्त्रोतांमधून केलेली एकूण कर्जाची गरज
2) सरकारी जमा व सरकारी खर्च यातील तफावत
3) कर्जाची एकूण व्याप्ती
4) वरीलपैकी सर्व   ✔️


*प्रश्न.५. गेल्या काही वर्षातील केंद्र सरकारच्या नियोजन बाह्य खर्चातील सर्वात मोठी बाब कोणती.?*

1) व्याज परतावा    ✔️
2) सबसिडी (सूट)   
3) राज्य सरकारांना अनुदान 
4) संरक्षण खर्च

*प्रश्न.६. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे.?*

अ) अल्प मुदतीचे कर्ज केवळ 12 महिन्यांकरता दिले जाते.
ब) अल्प मुदतीचे कर्ज केवळ 9 महिन्यांकरता दिले जाते.

*पर्याय :-*

1) केवळ अ   
2) केवळ ब   
3) एकही नाही    ✔️
4) निश्चित मुदत नाही

*प्रश्न.७. २००४  मधील हिंदुस्थान टाइम्स आणि इन्वेस्ट इंडीया व इकॉनॉमिक टाइम्स अभ्यासानुसार, ग्रामीण कर्जाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणत्या घटकाचा वाटा सर्वात मोठा आहे.?*

1) सावकार    ✔️
2) सार्वजनिक क्षेत्रातील बँका   
3) सहकारी बँका   
4) इतर

*प्रश्न.८. अप्रत्यक्ष कराचा कारभार विक्रेता ग्राहकावर पूर्णपणे केव्हा ढकलू शकतो.?*

1) मागणी पूर्णपणे लवचिक असते.
2) मागणी पूर्णपणे अलवचिक असते.  ✔️
3) मागणी सापेक्ष लवचिक असते.
4) मागणी सापेक्ष अलवचिक असते.

*प्रश्न.९. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे.?*

1) मूल्यवर्धित कर   
2) व्यवसाय कर    ✔️
3) सेवा कर   
4) विक्री कर


*प्रश्न.१०. विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे.?*

1) वित्तीय क्षेत्रात सुधारणा   
2) प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करात सुधारणा   ✔️
3) प्रशासकीय सुधारणा     
4) व्यापार सुधारणा

*प्रश्न.११. १९५० सालापासून केंद्र सरकारच्या महसूली जमा निधी मध्ये केंद्र सरकारचा कर महसूलाचा हिस्सा....?*

1) कायम तोच राहिला आहे   
2) कमी झाला आहे
3) वाढला आहे       
4) कुठल्याही प्रकारची स्पष्ट प्रवृत्ती दिसत नाही   ✔️

*प्रश्न.१२. केंद्र सरकारकडून घटक राज्यांना खालीलपैकी कोणत्या करातील वाटा अधिक प्रमाणात मिळतो.?*

1) अबकारी कर     
2) प्राप्ती कर   ✔️
3) संपत्ती कर    
4) विक्री कर

*प्रश्न.१३. केंद्र सरकारने आकारणी करून गोळा केलेल्या कर महसूलातून राज्यांना देण्यात येणा-या निधी बद्दल कोणता आयोग मार्गदर्शक तत्वे घालून देतो.?*

1) राष्ट्रीय कामगार आयोग   
2) विक्रीकर आयोग
3) वित्त आयोग        ✔️
4) उत्पन्नकर आयोग


*प्रश्न.१४. पुढीलपैकी कोणते कररोपण भारत सरकारकडून होत नाही.?*

1) प्राप्ती कर       
2) उत्पादन शुल्क   
3) शेती उत्पन्नावरील कर    ✔️
4) वरीलपैकी कोणतेही नाही

*प्रश्न.१५. MRTP कायदा मोडीत काढून २००९ साली त्याजागी अंमलात आणलेल्या कायद्याचे नाव ................... होते.?*

1) फेस्मा   
2) स्पर्धा कायदा    ✔️
3) अपस्पा कायदा   
4) औद्योगिक धोरण उपाय

Comments