*प्रश्न.१. सन 1986-87 पासून राज्य सरकारांच्या अंदाजपत्रकात कोणती प्रवृत्ती आढळते.?*
1) महसुली वाढावा
2) महसुली तुट ✔️✅
3) महसुली उत्पन्न व खर्चात वाढ
4) महसुली उत्पन्न व खर्चात समान दराने वाढ
*प्रश्न.२ . अर्थव्यवस्था सुप्त उत्पादनाच्या पातळीला कार्य करीत असताना पुढीलपैकी कोणती तूट सरकारच्या तुटीची रक्कम दर्शविते.?*
1) राजवित्तीय घट
2) महसुली तुट
3) रचनात्मक तुट ✔️✅
4) प्राथमिक तुट
*प्रश्न. ३. वर्ष 2008-09 मध्ये भारताचे ढोबळ उत्पन्न रू. 3323648 कोटी एवढे होते आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न रू. 2941971 कोटी एवढे होते. दोन्ही उत्पन्न पातळीवरील तफावत खालीलपैकी कुठल्या गोष्टी मुळे आहे.?*
1) भांडवली घसारा मूल्य ✔️✅
2) रुपयाच्या मूल्यातील घसरण
3) परकीय नागरिकांना द्यावयाचे उत्पादन घटक उत्पन्न
4) विदेशी थेट गुंतवणूकीतील घट
*प्रश्न. ४. ‘मृदा आरोग्य पत्रिका’ योजना भारत सरकारने सुरू केली असून 2016 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात एकुण किती रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.?*
1) 400 करोड
2) 468 करोड
3) 500 करोड
4) 568 करोड ✔️✅
*प्रश्न.५. पुढील विधानांचा विचार करा :*
अ) स्वातंत्र्यानंतरचा भारताचा पहिला अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी, 1948 ला आर. के. षण्मुख चेट्टी यांनी मांडला.
ब) भारतात सर्वात जास्त अर्थसंकल्प मांडण्याचा मान अर्थमंत्री मोरारजी देसाई यांना मिळाला.
क) प्रणव मुखर्जी यांनी त्यांचा पाचवा अर्थसंकल्प 16 मार्च, 2012 रोजी मांडला.
पर्याय :-
1) अ बरोबर, ब आणि क चूक
2) वरील सर्व बरोबर
3) ब आणि क बरोबर
4) अ आणि ब बरोबर आहेत ✔️✅
*प्रश्न. ६. खालीलपैकी कोणता भारताच्या केंद्रशासनाच्या भांडवली खर्चाचा भाग नाही.?*
1) संरक्षणावरील खर्च
2) सामाजिक आणि सामुहिक विकासावरील खर्च
3) व्याजाचा भरणा ✔️✅
4) सर्वसाधारण सुविधांवरील खर्च
*प्रश्न.७. जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये घट करून चलन वाढीवर नियंत्रण ठेवले जाते, तेव्हा त्या उपायाला काय म्हणतात.?*
1) राजकोषीय धोरणाचा उपाय ✔️✅
2) द्रव्यविषयक धोरणाचा उपाय
3) व्यापारी धोरणाचा उपाय
4) कर विषयक धोरणाचा उपाय
*प्रश्न. ८. खालीलपैकी कोणती कार्ये सार्वजनिक आयव्ययाची नाहीत.?*
१) संसाधनांची वाटणी
२) उत्पन्न विभाजन
३) स्थिरीकरण कार्ये
४) खाजगी वस्तुंचा पुरवठा ✔️✅
*प्रश्न.९. “सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत” कोणी मांडला.?*
1) प्रो. पिकॉक व प्रो. वाईजमन ✔️✅
2) प्रो. पिगु
3) डॉ. मार्शल
4) अॕडम स्मिथ
*प्रश्न.१०. सार्वजनिक खर्चासंबंधी पुढील बाबी विचारात घ्या.?*
*पुढीलपैकी कोणत्या बाबी आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत मदत करत नाहीत.?*
१) असा खर्च आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मदत करतो.
२) प्रादेशिक समतोल विकास साध्य करण्यात सहाय्य.
३) ग्रामीण भागात विद्युतीकरणाच्या सोयी उभारण्यात मदत.
४) व्यवहारतोल सुधारण्यात सहाय्य ✔️✅
Comments
Post a Comment