*1)*
*साबरमती आश्रम पूर्वी अहमदाबाद जवळील ....... येथे होता तो पूर्वीच्या जागेवरून प्ल्यग ची साथ असल्यामुळे हलविण्यात आला*
1) कोचार्ब✅
2) आनंदपुर
3) जालीसाना
4) दलोद
*2)*
*महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनाचा कालक्रम लावा*
1) आहमदाबाद, चंपारण, खेडा
2) खेडा , आहमदाबाद, चंपारण
3) चंपारण, आहमदाबाद, खेडा✅
4) चंपारण, खेडा, अहमदाबाद
*4)*
*पहिल्या गोलमेज परिषदे विषयी काय खरे आहे*
*अ) 12 नोव्हेंबर 1930 रोजी तिचे उद्घाटन झाले*
*ब) ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड तिचे अध्यक्ष होते*
*क) कॉंग्रेस धरून ब्रिटिश अमलाखाली 57 भारतीय सभासद तिला उपस्थित होते*
*ड) परिषदेत एकूण 89 सभासद होते*
1) अ आणि ब
2) अ, ब आणि ड✅
3) ब, क आणि ड
4) क आणि ड
*3)*
*........ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती*
1) शंकरराव देव✅
2) जमनालाल बजाज
3) के एफ नरिमन
4) किशोरलाल मश्रवाला
*6)*
*अमृतसर येथे झालेल्या अखिल भारतीय खिलाफत परिषदेत व्हाईसरॉय कडे एक प्रतिनिधी मंडळ पाठवण्याचे ठरले त्यांनी 19 जानेवारी 1920 रोजी व्हॉइसरायान्ना देण्याच्या पत्रावर सुप्रसिद्ध हिंदू राजकारणी पुढाऱ्यांनी सह्या केल्या होत्या. पुढील पैकी ते पुढारी कोण होते?*
*अ) गांधीजी*
*ब) स्वामी श्रद्धानंद*
*क) पंडित मोतीलाल नेहरू*
*ड) पंडित मदन मोहन मालवीय*
*इ) पंडित जवाहरलाल नेहरू*
1) अ, क, ड, इ
2) ब, क, ड, इ
3) अ, ब, क, ड, इ
4) अ, ब, क, ड✅
*5)*
*हरिजन साप्ताहिक बद्दल काय खरे आहे?*
*अ) त्याच्या पहिल्या अंकासाठी रवींद्रनाथ टागोरांनी द क्लीनसर ही कविता दिली होती*
*ब) डॉक्टर आंबेडकर यांनी पहिले अंकासाठी संदेश देण्यास नकार दिला*
*क) गांधीजींनी स्पष्ट केले की हरिजन हे काही त्यांचे साप्ताहिक नव्हती त्यांच्या मालकी हक्क विषयी सांगायचे तर ते हरिजन सेवक समाजाचे होते*
*ड) गांधीजींनी डॉक्टर आंबेडकरना सांगितले की साप्ताहिक जसे कुठले हिंदूचे आहे तितकेच आंबेडकरांचे ही आहे*
1) अ, ब, क
2) अ, ब, ड
3) ब, क, ड
4) अ, ब, क, ड✅
*7)*
*स्वराज्य पक्षाची महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते सभासद होते*
*अ) न. चि. केळकर*
*ब) शांताराम दाभोळकर*
*क) पुरुषोत्तम त्रिकामदास*
*ड) भुलाभाई देसाई*
*इ) जाफरभाई लालजी*
1) अ, ब, क
2) क, ड, इ
3) अ, ब, क, ड
4) अ, ब, क, ड, इ✅
*9)*
*1942 च्या भूमिकेत क्रांतीचे नेतृत्व केल्याबद्दल दैनिक ट्रिब्युनने 1942 ची झाशीची राणी म्हणून कोणाचा सन्मान केला होता?*
1) सुचेता कृपाळणी
2) मृदुला साराभाई
3) अरुणा आसफ अली✅
4) लीलाताई पाटील
*8)*
*पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे*
*अ) त्यांनी त्याचे शिक्षण कैरो येथील अल् - अझर विद्यापीठातून पूर्ण केले होते*
*ब) वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांनी अल्-हिलाल हे वृत्तपत्र सुरू केले होते*
1) मोहम्मद इक्बाल
2) बॅरिस्टर जीना
3) अबुल कलाम आझाद ✅
4) शौकत अली
*10)*
*1946 साली पुणे कराराच्या निषेधार्थ दलित सत्याग्रहीनीं मोर्चे काढले होते. त्यातील स्त्री सत्याग्रहाची पहिल्या तुकडीत...... या सहभागी होत्या.*
1) बेबी कांबळे
2) ताराबाई शिंदे
3) शांताबाई दानी✅
4) अवंतिकाबाई गोखले
Comments
Post a Comment